मीराताई, तुम्ही केलेले स्पष्टीकरण व्याकरणाला अनुसरून आहे. "त्वान्त" व" ल्यबंत "ही धातुसाधित अव्यये पूर्वकालवाचक असतात. त्यात विशेषणांचा अर्थ अभिप्रेत नसतो. "अस्पृश्य" आणि "वंद्य" हे दोन शब्द कर्मणी विध्यर्थ धातुसाधित विशेषणे आहेत. असो . शब्दिक खल पुरे.
हा लेख अप्रतिम आहे. तो कितिदाही वाचला तरी परत वाचून अनुभवासा वाटतो. तेवढी ताकद आहे या लेखात. हा अस्पर्शित लेख मनाला नुसता स्पर्शच करत नाही तर अंतर्मुख करतो. लेखक संजय क्षीरसागर यांना धन्यवाद.