पण मला त्यात काहीही स्वारस्य नाही.

एकदा एका शालेय प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काही विद्युत उपकरणं तयार केली होती आणि प्रत्येक जण मोठ्या हिरहिरीनं आपल्या उपकरणाचं कार्य बघणाऱ्यांना समजावून सांगत होता.

एकजण शांतपणे ते सर्व डेमोज पाहत होता, एका विद्यार्थ्याला त्यानं विचारलं ‘ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे तुमच्यापैकी कुणी मला सांगाल का? ’ सगळे हसायला लागले, ते म्हणाले तेच तर आम्ही दाखवतोय, तुम्हाला कोणत्या उपकरणाची माहिती हवीये. तो म्हणाला नाही मला इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते हवंय. विद्यार्थ्यांनी एचोडीला बोलावलं, तो ही पेचात पडला आणि (जे सगळे अध्यापक करतात तसं) म्हणाला आम्ही तुम्हाला नंतर कळवतो. मग त्यानं त्या गृहस्थाला विचारलं ‘बाय द वे आपलं नांव काय? ’ तो गृहस्थ म्हणाला ‘मी थॉमस एडिसन! ’

लोकांना वाटतं शब्द कळला की आपल्याला सगळं कळलं, आता दाखवा एकेकाला पण सत्य शब्दात नाही मग ते वेद असोत की गायत्री की उपनिषदं ते फक्त पाठांतर आहे त्यानं जगण्यात काही एक फरक पडत नाही.

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

संजय