मुद्दा विचार करण्यायोग्य आहे, पण...
- एखाद्या क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल एखादे विद्यापीठ एखाद्या व्यक्तीला ऑनररी डॉक्टरेट देते (त्या व्यक्तीचा त्या विद्यापीठाशी काहीही संबंध नसतानासुद्धा दुवा क्र. १), या पद्धतीत आणि वरील बाबीत नेमका फरक काय?
- अशाच प्रकारे, एखाद्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एखाद्या व्यक्तीस अनेकदा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत (आणि कदाचित इतर काही देशांतसुद्धा) 'सन्माननीय नागरिकत्व' (ऑनररी सिटिझनशिप दुवा क्र. २ , ज्यात असे नागरिकत्व देऊ केलेल्या व्यक्तीस नागरिकत्वाचे हक्क - किंवा कर्तव्येसुद्धा - नसतात दुवा क्र. ३ , असे नागरिकत्व केवळ कागदोपत्रीच - 'सिंबॉलिक' - असते, अगदी अमेरिकन पारपत्र बाळगण्याचा किंवा अमेरिकेत वास्तव्याचाही अधिकार अशा व्यक्तीस नसतो) देऊ करण्याची प्रथा आहे. या प्रथेत आणि वरील प्रकारात नेमका फरक काय?
माझ्या कल्पनेप्रमाणे, अशा सन्माननीय पदव्या, हुद्दे किंवा नागरिकत्व देऊ केले जाणे यात त्या संबंधित व्यक्तीचा गौरव नसून, त्या व्यक्तीशी अशा प्रकारे संबंध (असोसिएशन) जोडून त्याद्वारे स्वतःचा गौरव करण्याचा अशी पदवी, हुद्दा अथवा नागरिकत्व देऊ करणाऱ्या संस्था, राष्ट्र अथवा तत्सम एंटिटीचा (मराठी?) प्रयत्न अथवा उद्देश असतो. (थोडक्यात, सचिनला ऑनररी लष्करी हुद्दा देऊ करण्यात लष्कर सचिनचा गौरव करत नसून, 'सचिनसारखे लोक आमच्यात हुद्देदार आहेत' म्हणून स्वतःचा गौरव करून घेणे ही लष्कराची त्यामागील भूमिका असते. ही एक सामान्य आणि प्रचलित प्रथा असून, तीत काहीही गैर नाही, आणि एवीतेवी लष्कर आपलाच हुद्दा देववून आपलाच गौरव करवून घेत असल्याने, अशा प्रकारे नेमका कोणता हुद्दा संबंधित व्यक्तीला देववून स्वतःचा गौरव करवून घ्यावा हा पूर्णपणे लष्कराच्या अखत्यारीतला प्रश्न आहे; निदान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी हा प्रश्न सार्वजनिक अखत्यारीतला नाही.)