एन सि सि मधील ज्या प्राध्यापकांना ते हुद्दे दिले जात त्यांना सुरुवातीला लष्करी ट्रेनिंग दिले जायचे. त्यांना रिफ्रेशर कोर्सेसना जावे लागायचे. त्या काळापुरताच तो किताब होता. लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांप्रमाणे (निवृत्त) असे लिहून त्यांना किताब मिरवता येत नाही. चीनच्या आक्रमणानंतर ऐन वेळी विहीर खणण्याचा प्रकार म्हणजे त्याकाळात एन सि सि त केलेली प्रचंड वाढ. चीनने युद्ध थांबवले म्हणून लाज राखली गेली. नाहीतर या प्राध्यापकांनाही युद्धक्षेत्रावर जावेच लागले असते. पण तो बडगा त्याना सुदैवाने बघावा लागला नाही.

मीही सिविलियनच आहे.