प्रश्न विचारला नसताना प्रतिसाद देण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे पण एक उलगडा आवश्यक आहे.

धारणा (माइंड प्रोग्रॅमिंग) आणि बोध (अंडरस्टँडींग) यात फरक आहे.

‘वेळ’ ही धारणा आहे आणि ‘तो भास आहे’ हा बोध आहे. आपल्याला युगानुयुगं असं वाटतय की वेळ खरी आहे याचं कारण माइंड प्रोग्रॅमिंग आहे.

तो भास आहे हा बोध मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. माझं फक्त इतकंच म्हणणंय की धारणा कितीही युगांची असली तरी बोध एका क्षणात होतो. आता खरी कसरत बोधानंतर चालू होते कारण मी तुम्हाला फक्त बोध देऊ शकतो, एक नाही शंभर प्रकारे उलगडा करून दाखवू शकतो पण बोध आचरणात आणणं, तुमच्या रोजच्या जीवनात आणणं हे तुमचं बुद्धीकौशल्य आहे, तिथे मी काहीही करू शकत नाही.

स्वत:च्या अनुभवानी मी तुम्हाला सांगू शकतो की गेली वीस वर्ष मी घड्याळ वापरत नाही आणि तरीही माझं प्रत्येक काम वेळेपूर्वी पूर्ण असतं, झोपण्यापूर्वी काहीही अपूर्ण राहीलेलं नसतं, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी उठलो नाही तरी चालेल इतक्या निश्चींततेनं झोपू शकतो. वेळ भास आहे हे जाणून मी अत्यंत वक्तशीर झालोयं.

थोडक्यात,  बोध देऊन मी तुम्हाला धारणा मुक्त करतोयं पण बोध आचरणात आणण्याची जवाबदारी तुमची आहे नाही तर ती नुसती माहिती राहील, त्याला बोध म्हणता येणार नाही.

संजय