>एखाद्या क्षणी  तो बॅलेन्स स्वतःचा स्वतःला कळेल

= नाही, आता या क्षणी कळेल, तुम्ही  लेख पुन्हा वाचा.

एकदा एक बोध झाला की तो आचरणात आणणं सायकल चालवणं आहे हे मी मान्य करतो कारण धारणांचा पगडा जुना आहे.

हे एकदम महत्त्वाचंय, समजावून घ्या. बोधाला वेळ लागत नाही, तो एकतर झाला किंवा नाही झाला, नाही झाला तर त्याचा पिच्छा पुरवा पण आचरण हे प्रोग्रॅमिंगच अनवाईंडींग आहे ते दिवसभरच्या सर्व प्रसंगात राखणं कौशल्य आहे.

कदाचित तुम्ही एकदम माझ्यासारखं घड्याळ सोडू शकणार नाही पण बोधाचा निवांतपणा तुमच्या चालण्यात, वागण्यात, बोलण्यात, कामात प्रकट व्हायला लागेल. तुमची वेळ गाठण्याची जीवघेणी धडपड कमी व्ह्यायला लागेल, वेळ हुकली तरी 'आता काय करता येईल? ' असा दृष्टीकोन होईल, तुम्ही सदैव वर्तमानात रहाल. 

बोध एकदा झाला की पुन्हापुन्हा वर येत राहतो आपण त्याची दखल घेतली की झालं!  

संजय