संजयजी,

मला पटले म्हणूनच लिहिले - परफेक्ट!  मजा आ गया!    गैरसमज काहीच नाही..

>बोध एकदा झाला की पुन्हापुन्हा वर येत राहतो आपण त्याची दखल घेतली की झालं!  

=सायकल चालवताना एकतर बॅलेन्स सांभाळता येतो किंवा येत नाही. अधलीमधली स्थितीच नाही. एकदा का बॅलेन्स सांभाळायला जमलं की त्यानंतर सायकल चालवायचा आनंद आणि पुन्हा पुन्हा सायकल चालवून येणारे पर्फेक्शन यामुळे विनासायास सायकल चालवणे जमते. बॅलेन्सची दखल घ्यायची गरजच नाही.

अडचण ही आहे की ज्याचा त्याचा बॅलेन्स ज्याला त्यालाच जमायला हवा! त्याला कोणीही सांगून उपयोग नाही,खरं तर ते शिकवताच येत नाही.सायकलवर बसवण्याशिवाय कोणीही कोणाची काहीही मदत करू शकत नाही.

बॅलेन्स सांभाळण्यासाठी काहीही करावे लागत नाही, फक्त आपल्याला बॅलेन्स जमतोय याची एकदा जाणीव  झाली की बस्स.

देव नाही हे ज्याचे त्यालाच आकलन व्हावे लागते.आपण फक्त लॉजिकली सांगू शकतो,परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही असाच अनुभव आहे. हेही काहीसे तसेच असावे.