तुम्ही सत्याप्रत (किंवा स्वत:प्रत) दोन प्रकारे येऊ शकता:
एक, आपण सत्य आहोत हा उलगडा (माझ्या बाबतीत असं झालं) आणि त्या उलगड्यातून इतर सर्व धारणांचं निराकरण.
दोन, आपल्या सर्व धारणांचं निराकरण आणि त्यातून आपण सत्य आहोत हा उलगडा.
आता हे असंय, आपण व्यक्ती आहोत ही प्रत्येकाची सर्वात मूळ धरणा आहे आणि ती अनेकानेक धारणांच्या (आपण शरीर आहोत, मनाच्या अगम्य कल्पना आणि त्याचं सर्व जीवनावर चालणारं अधिराज्य, आपली नाती, आपल्या भावना, संस्कार, आपली बौद्धिक क्षमता, सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान) अशा कमालीच्या गुंतागुंतीनं बनलीये.
मी इथे दुहेरी प्रयत्न करतोयं, एका बाजूला तुमच्या धारणांचं निराकरण आणि समेवर येतांना तुम्हीच सत्य आहात हा बोध.
संजय