आपण दिलेल्या प्रतिसादाला वर्ष उलटल्यावर उत्तर देतोय, क्षमस्व. खरं म्हणजे कथा लिहून बरेच दिवस झाले म्हणजे तिकडे
पाहिले जात नाही. पण वाचक केव्हाही वाचू शकतात आणि प्रतिसाद त्याप्रमाणे देऊ शकतात. सदर कथेत किशोरचाच काय
कुणाचाच दोष नाही. असलाच तर भोवतालची परिस्थिती, जी विक्षिप्त समाजव्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे. आणि सामान्य
माणसाला हिरो बनायचं मनात असलं तरीही तो परिस्थितीने गांजलेला असतो. मग मनात मांडे खाण्याशिवाय काय उपाय आहे ?
मी सुद्धा त्यातलाच आहे. वेगळा कसा असणार ? उत्तर अतिशय उशिरा दिले गेल्याने आपण राग मानू नये. सदर कथेचे कथनही
मी केले आहे. संपल्यावर लोक असेच प्रश्न विचारतात, ज्याला माझ्याजवळ उत्तर नाही.