>याचे दोन अर्थ आहेत :

एक, (त्या कथेच्या संदर्भात) उपयोगिता जाणली म्हणजे तत्त्व जाणलं असं नाही
दोन, (माझ्या लेखाच्या संदर्भात) शब्द जाणला म्हणजे सत्य जाणलं असं नाही

हे ठीक आहे. त्याबद्दल वाद नाही.

= हाच तर मुद्दा आहे आणि तो मंजूर असेल तर विषयच संपला

>पण ह्याचा अर्थ असा नाही की, "सत्य/तत्त्व जाणलं (किंवा तसा दावा असला)

= माझा दावा ‘आपण सत्य आहोत’ असायं आणि तो मी सत्य जाणलंय म्हणून आहे.

मी सत्य आहे हे उघड आहे पण ते सांगायला मी लिहित नाहीये, मला ते सांगायला लेखनाची गरज नाही, लेखनाचा हेतू ‘तुम्ही सत्य आहात’ हे सांगणंय.

>म्हणजे मान्यताप्राप्त शब्द वापरायचे नाहीत / वापरले नाहीत तरी चालेल" असे माझे म्हणणे होते/आहे.

= अस्पर्शित हा मान्यताप्राप्त आणि सहज कळणारा शब्द आहे आणि तो मोल्सवर्थमधून अर्थासहित दाखवून दिलाय. मला अवघड शब्दात लिहिताच येत नाही पण अजून शब्दांचाच आग्रह आहे, अर्थाची चर्चा नाही आणि तेच मी या लेखात सांगतोय.

संजय