( मागे एकदा मी ही गोष्ट सांगितलीय, पण वेगळ्या संदर्भात )

एका वर्गात एक शिक्षिका मुलांना मोठ्या गंभीरपणे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध समजावून सांगते आणि म्हणते की या शोधामुळे आज आपण पृथ्वीवर आहोत आणि मग मोठ्या अभिमानानं विचारते, ‘कुणाला काही शंका? ’ त्यावर वर्गात घोर शांतता पसरते. मागच्या बाकावरचा एक मुलगा हात वर करतो, ‘येस? ’

‘मॅम, न्यूटननं शोध लावण्यापूर्वी सफरचंद खालून वर जायची का? ’

नाऊ सी, न्यूटनचा शोध उपकारक ठरलाय पण जे वास्तवात होतंच त्याला आपण ‘गुरुत्वाकर्षण’ असं 'नांव' दिलंय. तुम्ही त्याला काहीही नांव दिलं किंवा काहीही नांव दिलं नाही तरी ते तसंच राहील. शब्द फक्त निर्देश करतो, आपण जर शब्दच धरून बसलो तर अर्थाप्रत कसे पोहोचणार? याचा अर्थ विसंगत किंवा अर्थशून्य शब्द वापरा असं नाही, वाचणाऱ्याप्रत लेखक पोहोचला की झालं.

संजय