>हे एक्सॅक्ट असंच आहे!!!!!!!
मी कितीवेळा हे अनुभवलंय!!

= माझी प्रायवेट काऊन्सेलिंग लाईन आहे, जे प्रश्न लोक पब्लिक फोरमवर विचारू शकत नाहीत ते अत्यंत खाजगी प्रश्न मला तिथे विचारले जातात. प्रत्येकाला असं वाटतंय की आपले प्रश्न युनीक आहेत, असे प्रश्न जगात इतर कुणाला नाहीत पण असं नाहीये. व्यक्तीमत्व वेगवेगळी आहेत त्यामुळे प्रश्न वेगवेगळे वाटतात पण मूळ प्रश्न एकच आहे : व्यक्तीमत्व.

तुम्हाला वाटतं, स्त्रियांचे आणि पुरुषांचे, श्रीमंतांचे आणि गरीबांचे, तारुण्य आणि वार्धक्याचे, बुद्धीमानांचे आणि कमी शिकलेल्यांचे, एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांचे आणि विभक्तांचे, एकदम तंदुरुस्त असणाऱ्यांचे आणि दुर्धर रोग असलेल्यांचे,    सामान्यांचे आणि असामान्यांचे प्रश्न वेगवेगळेत पण मी इतक्या थरातल्या, विवीध देशातल्या इतक्या लोकांशी संवाद साधलायं आणि सांगतोय की प्रश्न एकच आहे, फक्त प्रश्नांकडे पाहणाऱ्याची परिस्थिती वेगळी आहे.

हे एक्सॅक्ट असंच आहे!!!!!!! ही कबुली मात्र कुणी देत नाही

>> विचारांचं प्रत्येक आवर्तन आपल्या न्यूनत्वाकडे निर्देश करतं
पण हे असंच का?? हे सततचं जजमेंट करणं, स्वतःला क्रिटीसाईज करणं इन्वॉलंटरीली का चालू असतं? बाकीचे तरी त्याना स्वतःला इतके जज करताना दिसले नाहीत मला..

= मी वर लिहिलंय... ‘मानवाला संगोपनाचा शाप आहे कारण त्याची व्यक्ती म्हणून घडण अपरिहार्य आहे’ वरून कुणी काहीही दाखवो, एकदा व्यक्तीमत्व आलं की कंपॅरीजन आली आणि त्यातून काँप्लेक्स येतोच.

सिकंदर दिसणाऱ्याचा वेगळा असेल आणि सामान्य आयुष्य लाभलेल्याचा वेगळा असेल पण काँप्लेक्स आहेच. परिस्थिती अनुकूल असेल तर तो सहज दिसणार देखील नाही पण मुळात व्यक्तीमत्व हाच काँप्लेक्स आहे.

अस्तित्वात मानवी मुलाला स्वयंपूर्ण व्हायला सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो आणि त्याला नाईलाज आहे.  संगोपनावर लिहिण्याची माझी इच्छा आहेच पण त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

संजय