मनोगताला भेट देऊन शुद्धिचिकित्सक, पारिभाषिक शब्दशोध ह्या मनोगती सुविधांचा लाभ नियमितपणे घेणाऱ्यांची वाढती संख्या पाहिली तर आपली भाषा निर्दोष, सकस व्हावी ही भावना आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते, त्यामुळे मराठी भाषाविषयक चित्र वरील लेखनात म्हटल्याप्रमाणे निराशाजनक नसून खरेतर आशादायक आणि उत्साहवर्धक आहे असे म्हणावेसे वाटते.