" नाट्यसंगीताचा जास्त प्रभाव जर पडला तर शास्त्रीय संगीताची जी शान आहे,
त्यात स्वरांच्या ज्या श्रुतिव्यवस्था आहेत त्याला जो दर्जा आहे तो खलास
होईल असे माझे मत आहे. "
वरील मताशी मी काहीसा सहमत आहे..
---- नाट्यपदं नसती तर हेच शास्त्रीय संगीत अजून वाढीला लागलं असतं. महाराष्ट्रातील संगीतही खऱ्या अर्थानं मोठं झालं असतं. "
असहमत..!
श्री. विनय हर्डीकर यांनी या पुस्तकास लिहिलेल्या पंचवीस पृष्ठांच्या
अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत मात्र किशोरीताईंपेक्षाही कडक शब्दात
नाट्यसंगीताची हजेरी घेतली आहे.
कोण विनय हर्डीकर? कृपया खुलासा करावा..
...याचे कारण कदाचित भजनसदृश्य अभंगवाणीसारख्या कार्यक्रमाची लोकप्रियता त्यांनी वाढवली हे असावे.
हे कारण नसून जळजळ आहे. भीमण्णांनी आपल्या समृद्ध गायकीने अभंगगायन हा गायनप्रकार इतका आभाळाइतका मोठा केला आहे, शिवाय त्यात इतकी अफाट लोकप्रियताही मिळवली आहे, ही भल्याभल्यांकरता एक कायमस्वरूपी पोटदुखीवजा जळजळ ठरली आहे, असे शास्त्रिय संगीताच्या दुनियेत काही काळ वावरल्यामुळे मी खात्रीलायकरीत्या म्हणू शकतो..
श्री. हर्डीकर यांच्या मते नायक कलाकार म्हणजे "शिस्त मोडायची नाही पण
नावीन्य आणि वैचित्र्य यांची मागणी पुरवून शिवाय संगीतामध्येही भर
घालायची" हे करणारे कलाकार.
नावीन्य आणि वैचित्र्य असणारे संगीत हेच काय ते संगीत असे मानणाऱ्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. पौष्टिक आणि पोटाला चांगला म्हणून नावीन्य असलेल्या कणकेच्या वा नाचणीच्या लाडवाचे आम्ही काही काळ कौतुक करू, पण म्हणून त्याची तुलना साजूक तुपातल्या मोतीचूर किंवा खमंग बेसनाच्या लाडवाशी होऊ शकत नाही..!
-- तात्या.