एखाद्याला अशी आवड असणे हे चुकीचे आहे का ?

मुळीच नाही. संगीत हे अफाट आहे, अनंत आहे. कुणाला कुठली सुरावट आवडावी किंवा आवडू नये याचे काही नियम नाहीत. मैफलींच्या संगीताचा आनंद ज्याप्रमाणे सामुदायिकरीत्या घेता येतो, त्याचप्रमाणे आपले आवडते ध्वनिमुद्रण ऐकून एखाद्याला अगदी एकट्याने त्याचा स्वानंदही घेता येतो. थोडक्यात, संगीत हे सर्वव्यापी आहे. कुठल्या प्रकारच्या संगीताचा आनंद घ्यायचा हा ज्याच्यात्याच्या अगदी वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे.

तात्या.