नवीन कवी, संगीतकार खरच इतके कुचकामी आहेत का? आपली मते कळवावी...

तूर्तास माझे मत मी राखून ठेवत आहे.

अर्चना,

वरील एका प्रतिसादात आपण,

आशाताईंची अनेक गाणी खोलवर रुतली आहेत, ती चांगलीच आहेत...

हे विधान केले आहे. मी त्याच विधानाचा धागा पकडून असे म्हणेन की अद्याप तरी आपण उद्घृत केलेल्या रहमान, शंकर महादेवन, अजय-अतुल, विशाल भारद्वाज, गुलजार, जावेद, स्वानंद किरकिरे आदी कलाकारांनी केलेली गाणी अद्याप तरी माझ्या मनात खोलवर रुतलेली नाहीत! (गुलजारसाहेबांचा अर्थातच अपवाद. त्यांची पंचमदांसोबतची गाणी माझ्याकरता लाखमोलाची आहेत हे नमूद करतो)

तूर्तास मला जुनीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. त्या तुलनेत नवीन गाणी ऐकावीशी वाटत नाहीत. म्हणून सध्या मी माझे मत राखून ठेवत आहे.

(जुन्याचा भोक्ता) तात्या.