किशोरीताई आणि हर्डीकरांचे विचार वाचून आश्चर्य वाटले. मात्र, ह्या लेखामध्ये त्यांचे विचार काय आहेत हे सांगितले असले तरी ते तसे का आहेत हेही स्पष्ट झाले तर बरे असे वाटले. मला नाट्यसंगीत आवडते. संथ ख्यालगायन न आवडणाऱ्यांना शात्रीय, रागांवर आधारित, मात्र वेग असलेले नाट्यसंगीत आवडू शकते. ख्यालगायनात शब्दांना फार महत्त्व असते असे मला तरी आढळलेले नाही. त्यामुळे नाट्यसंगीतातील शब्दांमुळे शात्रीय संगितावर वाईट परिणाम होऊ शकतो हे मला पटत नाही. अस्थाई-अंतरा मिळून ख्याल सामान्यतः चार ओळींचा असतो आणि एकेक शब्द/ओळ अनेकवेळा म्हटली जाऊ शकते. तरीही एखाद्या प्रसिद्ध वा अप्रसिद्ध गायकाने गायलेल्या ख्यालातील शब्द (शब्द आधीच ओळखीचे नसल्यास) ख्याल ऐकता ऐकता बिनचूक लिहून दाखवता येईल का ह्याबद्दल शंका वाटते.