नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगिताला पर्याय आहे असे समजून ऐकणाऱ्या/वा गाणाऱ्यांसाठी तुम्ही म्हणता ते खरे ठरेलही, पण शास्त्रीय संगितावर आधारित असलेले असे नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगिताला पर्याय म्हणून ऐकू नका असे शिकवल्यास शास्त्रीय संगिताला नाट्यसंगिताचे भय वाटू नये. ज्याला श्रुतीव्यवस्था, दोन रागांमधल्या सामायिक स्वरांमधील सूक्ष भेद वगैरे जाणून घ्यायचे आहे तो रसिक केवळ नाट्यसंगीत ऐकून थांबेल असे वाटत नाही.