वरदाजी,
पण शास्त्रीय संगितावर आधारित असलेले असे नाट्यसंगीत हे शास्त्रीय
संगिताला पर्याय म्हणून ऐकू नका असे शिकवल्यास शास्त्रीय संगिताला
नाट्यसंगिताचे भय वाटू नये.
वाक्य फारसे सजमले नाही. कृपया थोडे सोपे करून सांगता का?
माझ्या मते रागसंगीतावर आधारित असलेले नाट्यपद ऐकल्यास रागसंगीताची गोडी लागण्यास नक्कीच मदत होईल.
उदाहरणार्थ, 'नाथ हा माझा' हे यमनातले पद ऐकून बडा ख्यालातल्या यमनासारखी स्वरांच्या बढतीची मजा, प्रत्येक स्वराची बहुरंगी/बहुढंगी बढत आणि त्यातून रागाची व्याप्ती लक्षात येणार नाही, परंतु यमनची गोडी लागण्यास मात्र नक्कीच मदत होईल. एकदा का 'नाथ हा माझा' मुळे यमनशी ओळख झाली आणि त्याची गोडी लागली की मग किराणा, ग्वाल्हेर, पतियाळा, भेंडीबाजार या घराण्यात पसरलेल्या यमनच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर तुम्ही उभे असाल. त्यातून मग कुणी किती दूरवर जायचं, खोलवर जायचं हे ज्या त्या श्रोत्याच्या कुवतीवर अवलंबून असतं. (येस्स. श्रोत्यांची कुवत. आय मीन इट..! )
रागसंगीताच्या दुनियेतील नवख्यांना यमनच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापर्यंत आणून सोडणं, यात 'नाथ हा माझा' किंवा 'समाधी साधन' इत्यादींचा मात्र मोलाचा वाटा आहे, हे मात्र कुठेतरी कबूल करावंच लागेल..
(बड्याख्यालातला) तात्या.