मनोगतींनी अभ्यासपूर्ण योग्य प्रतिसाद दिले आहेत. मी स्वतः संगीतावर प्रेम करणारा पण अभ्यासक नाही त्यामुळे माझी सांगीतिक वाटचाल सिनेसंगीत (त्यावेळी हेही अभिजाततेकडे झुकणारे होते), सुगम संगीत, नाट्यसंगीत , उपशास्त्रीय संगीत व शास्त्रीय संगीत अशी झाली त्यामुळे नाट्यसंगीतावरील आगपाखड तसेच भीमसेन हे माझे दैवत असल्याने हाताच्या बोटात त्यांचा समावेश होऊ नये या दोन गोष्टीमुळे मला  होणारी वेदना मी मांडली होती. विनय हर्डीकर कोण ही गोष्ट महत्त्वाची नाही कारण या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्यास त्याना मुद्दाम पाचारण करण्यात आले  त्या अर्थी व प्रस्तावनेच्या लांबीवरून ते संगीतक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावेत असे वाटते.