वरकरणी कितीही अपयशी आणि सामान्य असलो, आपल्याला दुसऱ्यानं मानलं किंवा नाही मानलं तरी आपल्या सत्य असण्यात कणभरही फरक पडत नाही

आपण समाजात राहत असल्यावर चार चौघांनी मानलेली यश/अपयशाची परिमाणं आपल्यालाही लागू असतात त्यामुळे लौकीक अर्थाने जे यश समजले जाते ते मिळाल्यावर निश्चीतच आनंद होतो आणि अपयश मिळाल्यावर दुःख होते. आता असे अपयश मिळाल्यावर लोकांना आपण सत्य आहोत आणि तुम्ही ह्या अपयशाकडे दुर्लक्ष करा असे सांगू शकत नाही. त्या अपयशाचे दुःख सहन करावेच लागते जे खुप क्लेशदायक असते.