यशापयश हे अनेकानेक गुंतागुतीच्या घटकांवर अवलंबून आहे, आपण यशस्वी होत नाही की अपयशी होत नाही, सदासर्वदा एकसारखे राहतो हे एकदा लक्षात आलं की झालं आणि समेवर येणं म्हणजे प्रत्येक कृत्यानंतर, प्रसंगानंतर स्वतःशी संलग्न होणं, ही सम सांगायचा मी प्रयत्न करतोयं.

जशी संगीतातली सम स्वर, लय, ताल पेलून देखील त्यांनी अनाबाधीत आहे, म्हणजे ते सगळं चुकलं तरी तुम्ही तालाच्या आवर्तनाच्या शेवटाला ती पकडू शकता तसे आपण आहोत, एकदा सम गवसली की ती भर प्रसंगातही पकडता येते आणि मग प्रसंगाचा आपल्यावर परिणाम  होत नाही.

संजय