["हा निराकाराचा सतत बोध आकार आणि निराकार यांच्यात तोल निर्माण करतो.
यामुळे दुसरी गोष्ट आपसूक घडते, तुमच्या प्रत्येक क्रियेत डौल आणि सहजता यायला लागते. निराकारानं (किंवा तुम्ही) सर्व शरीर व्यापल्यामुळे तुम्हाला साध्या चालण्यात, बसण्यात, बोलण्यात आनंद वाटायला लागतो. जरा आवाज वाढायला लागला की तुम्हाला प्रयासाची जाणीव होते; जरा धावपळ सुरू झाली की तुम्हाला निराकाराच्या भानामुळे काहीतरी चुकतंय हे कळायला लागतं कारण हृदयाची धडधड वाढलेली असते, श्वासाचा रिदम हुकलेला असतो, मग तुम्ही पुन्हा मध्यात येता. हा मध्य, हे समत्व, आकार आणि निराकार यामधला तोल आहे.
या तोलामुळे तुमची स्वतःची अशी स्टाईल तयार होते आणि लोक त्याला कौशल्य किंवा सहजता म्हणायला लागतात! "]
--------------
हे एक्झाक्टली अस्सच अनुभवतेय! एक स्टाइल तयार झाली आहे
आपण निराकार आहोत वगैरे थिओरटिकली मान्य पण रोजच ते मानत राहण्यात मजा नाही असे वाटायचे, पण तुमचे लेख वाचून वाचून काही बदल झाला आहे हे नक्की, आणि या देहात कलह निर्माण झाले परत की हे सगळे आठवून स्वताला शांत करता येते. आता आईला फोन करावा लागत नाही

(तशीही ती या जगात आता देहावतारात नाही)
धन्यवाद! लिहीत राहा!
सोहमव्योम!