८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते.
इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट
वापर करणार्यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल
अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्यात
किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्या व्यक्तींमधे स्त्रिया आणि
पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं
असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)
विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी,
विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता
स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं
आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा
करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.
विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृती अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्यांची मतं महत्त्वाची वाटतात.
निदान इथे काही चुकतं आहे
का असा विचार झाला तरी खूप.
---
हा विदा गोळा कसा केला याबद्दल नाईल यांनी ऐसी अक्षरेवर दिलेला प्रतिसाद मला पटला. तो इथेही चिकटवत आहे.अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष
हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल
स्वतःच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही
पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर
सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.