मला ओशोंचं पुस्तक वाचायला मिळालं.
"वॉचींग इज द ओन्ली मेडिटेशन" असं वाक्य होतं. मी करून बघायला लागलो. विचार बघणे, स्वतःला ऑब्सर्व करणे.
हे करत असताना परत आधीच्यासारखंच बरं वाटायचं. पण थोड्या दिवसांतच लक्षात आलं , की हे विचार बघणे आपोआप होतच असतं, आपण कशाला काय करायला हवं ?... परत एक प्रयोग संपला.
आता मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे विचार (शब्द, आवाज, चित्र) उमटतात, ते कुठल्यातरी बॅक्ग्राउंड वर उमटतात. आता कोणताही विचार आला, कि स्वतःला हा प्रश्न करायला लागलो, कि विचार आलाय हे कुणाला, रादर कुठं कळतंय ?
लक्षात आलं , की ज्या गॅप चा उल्लेख झालेला होता (पॉवर ऑद नाउ मधे) तो गॅप तर कायम आहेच ! विचार येण्यापुर्वी, उमटताना, आणि उमटल्यानंतरही आहेच.
हे तर लक्षात आलं, पण एक गोष्ट कायम होती. विचारांची गर्दी तशीच होती. त्यासाठी पुढं काय करायचं आता हा प्रश्न परत हजर !
----------------------------------------------------------
आता मनोगत वर लेख चालू झाले. एका लेखावरच्या प्रश्नावरच्या "अवेअरनेस नाही तर रेलॅक्सेशन. काही शोधायची गरज नाही" या उत्तरानं गाडी परत रुळावर आली. मला जो निवांतपणा हवा होता तो कसा मिळेल याच्या शोधात मी निवांतपण घालवून बसत होतो. समज कमी होती, आहे. अजुनही जे जे समजतंय ते कायम आचरणात आणणे तरी जमलेलं नाही.
पुढं मग प्रत्येक लेखातून , प्रश्न प्रतिसादांमधून नवीन नवीन गोष्टी कळत आहेतच ..