......पण असं भान न राहिल्यामुळे चर्चा मूळ मुद्द्यापासून दूर जातात. स्त्रिया हे
सततच भान ठेवून तर्कशुद्ध लिहू शकत नाहीत (दे कांट टो अ लाईन ऑफ
आर्ग्युमंट फॉर लाँग) कारण त्यांचा कल भावनिक असतो ... ...
हा भेद स्त्री-पुरुष असा असेल असे वाटत नाही. हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून असावे. किंवा फार तर हे शिक्षणातील फरकामुळे घडत असावे. उदा. अभियांत्रिकी/गणित इ. शिकलेल्या व्यक्ती, वाणिज्य विभागात शिकलेल्या व्यक्ती आणि वैद्यकीय विभागात शिकलेल्या व्यक्ती ह्यांच्या तर्कसंगत विचार करण्याच्या पद्धतीमध्ये (असलाच तर) शिक्षणातील फरकामुळे भेद असणे शक्य आहे, मात्र तो स्त्री-पुरुष असा भेद होईल असे मला वाटत नाही. चू. भू द्या. घ्या.