स्त्रियांची भावनिकता हा प्रत्येक पतीचा नेहमी येणारा अनुभव आहे.
परवाचीच घटना आहे. माझा मित्र आणि त्याची पत्नी वाद घालत होते. त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत शिकायला गेलीये त्यामुळे ते दोघंच इथे असतात. ‘विमेन्स डे’ ला घरातल्या मेड्ससाठी तुम्ही काय घेतलंत म्हणून तिनं फोनवर विचारलं तर मित्र म्हणाला ‘काय घ्यायचं? ’ ती म्हणाली ‘अरे, काहीही गिफ्ट चालेल, चॉकलेट बॉक्स दिलेत तरी चालेल’. हा जाऊन तीन बॉक्सेस घेऊन आला आणि मोठ्या आनंदानं त्यांनी ते मेड्सना दिले, त्याही खूश झाल्या. थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की बायको गप्प आहे.
तो म्हणाला ‘काय झालं’?
‘तू माझ्यासाठी काही आणलं नाहीस’
‘लगेच आणतो,
‘आता काय उपयोग आहे! ’
‘तू फक्त काय हवं ते सांग, चॉकलेट बॉक्स, ड्रेस, बाहेर जेवण’
‘मला काही नको, तुझं हे नेहमीचं आहे इतकंच मला दाखवायचंय’
‘जर मला अद्दल घडवायची असली तर सहा सूर्यनमस्कार घालतो त्यानं पुढच्या वेळी लक्षात राहील आणि मग चॉकलेट बॉक्स, ड्रेस, आणि बाहेर जेवण, चालेल? ’
‘आता काही उपयोग नाही, ती वेळ गेली! ’
त्यानं मला फोन केला, आम्ही बाहेर फिरायला गेलो, त्याच्या पत्नीनं टीवी ऑन केला. चर्चा निष्फल, मुद्दा कायम!
मला देखील स्त्रिया मुद्दा भावनिक का करतात याची उत्सुकता आहे
संजय