गेल्या पाच सात वर्षात स्त्रिया ईटरनेटवरच्या वावराबद्दल जास्त जागरूक झाल्या आहे.. तुम्ही दिलेला चर्चा प्रस्ताव इतका साधा सरळ नाही असे मनात येऊन अनेक स्त्रिया गप्प असतीलः) अनेकदा दूर्लक्ष करणे आणि अनुल्लेखाने मारणे हा मार्ग जास्त सोयीचा असतो . इथल्या अनेक स्त्रिया तो स्वीकारतात. अनेकदा त्यात शहाणपणाच दिसतो. असो. मला तो फारसा पटत नाही, जमत नाही म्हणून हा प्रतिसाद!
दिलेली माहिती आवडली. पण या माहितीने रोजच्या जीवनात फरक पडला नाही. कोणत्या संकेतस्थळावर जायच, कुठे लिहायचे या भूमिकेतही फरक पडला नाही. पण मी जिथे वावरते तिथे तिथले नियम लक्षात घेऊन वावरते. तडजोड शक्य नसेल तेव्हा बाजूला होते. एखादी गोष्ट फुकट मिळाली म्हणून तिचा गैरवापर करायचा नसतो हे अनेकांना मान्य असते तसे मला मान्य आहे.
मनोगतावर स्त्रियांवर टीका होत नाही असे नसून इथे त्यामागे एक सकारात्मक भूमिका असते हा माझा अनुभव आहे. स्त्रियांना इथे लेखन करू नये असे वाटावे असे वातारवरण इथे कधीच नव्हते. त्यामुळे मनोगत या संकेतस्थळावर पुरुषप्रधान वृत्ती वगैरे नाही. साईटची ती वृत्ती नसते ;ती त्यावर वावरणाऱ्या सदस्यांमुळे व्यक्त होणारी वृत्ती असते. त्याला सदस्य जास्त जबाबदार असतात. मनोगताच्या प्रशासनाचे जे नियम, जे उद्देश आहेत ते अतिशय स्पष्ट आहेत , ते वेळोवेळी स्पष्ट केले आहेत, त्यानंतर इथे लेखन करणे / न करणे हा लेखकाचा निर्णय आहे. त्याचा त्रास स्त्री पुरुष दोघांनाही होऊ शकतो.
मनोगताचे प्रशासन स्त्री आणि पुरुष असा भेद करते असेही मला जाणवले नाही!
बाकी स्त्रिया का लिहित नाहीत याची कारणे वेगळी असतील.