गंगाधरसुत - सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. माझ्या कवितेत कोणी सुधारणा सुचविल्या तर नक्कीच आवडतात.
फाल्गुनाचा काही खास संदर्भ आहे का ? - फाल्गुन वद्य द्वितीया - तुकारामबीज - सदेह वैकुंठगमन सोहोळा - त्या आठवणीने तेथील पिंपुर्णीचा वृक्ष अजून थरारतो - (असे म्हणतात) - मी इथे त्याचा काव्यात्म वापर करण्याचा प्रयत्न केलाय.
इथे (मनोगत वर) कवितेत काही सुधारणा कशी करायची हे कळत नाहीये -
शेवटचे कडवे असे -
शब्दाशब्दातून गाथेच्या
....विठ्ठलभक्ती नाद उमटतो
असा आगळा भक्त लाभला
....... 'धन्य धन्य मी' विठ्ठल म्हणतो..
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजचरणी सादर समर्पण. इति.