निराकाराशी संपर्क म्हणजे स्वत:शी संपर्क, त्यामुळे आपण नेहमी उत्साही आणि स्वच्छंद राहतो.
रेकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्याला उर्जा संक्रमणाची प्रक्रिया आहे आणि माझा प्रयत्न सरळ तुम्हालाच तुमच्या संपर्कात आणायचा आहे. रेकीमध्ये तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असता (किंवा द अदर वे).
जर तुम्हाला निराकार गवसला आणि तुम्ही सतत स्वत:च्या संपर्कात राहायला लागलात तर तुमच्या भोवती सतत एक विधायक वातावरण राहील आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला त्यातून उर्जा मिळेल.
शारीरिक व्याधी आणि मानसिक संतुलनासाठी मी प्राणायाम आणि योगा सुचवीन ते हमखास आहेत कारण ज्या रेकी मास्टर्सना मी भेटलोयं त्यांचे स्वत:चेच व्यक्तीगत प्रश्न त्यांनी माझ्याकडून सोडवून घेतलेत. संजय