लग्नानंतर लग्नाबाहेरची मैत्री करायला/चालू ठेवायला हरकत नाही. मात्र ही मैत्री कशी व्यक्त केली जाते ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा ती शरीरस्पर्शातून व्यक्त केली जाते. ही जवळीक खांद्यावर हात ठेवून जवळ ओढणे, कमरेभोवती हात घालून एकत्र चालणे, डिस्कोमध्ये डान्स करणे, अशासारखी असेल तर लग्नबंधनात असलेल्या व्यक्तीना आपल्या जोडीदाराच्या बाबतीत अशा गोष्टी झालेल्या कितपत आवडतील याची शंकाच आहे. सर्वच जण जशास तसं वागण्यास तयार होतील असं नाही.
या बाबतीत एक धोक्याची सूचना द्यावीशी वाटते. लग्नबाह्य मैत्रीत जेव्हा वरीलप्रमाणे शारीरिक जवळीक हे अविभाज्य अंग बनतं तेव्हा पाय घसरण्याची शक्यता वाढते, नि एकदा पाय घसरायला लागला की सावरणं अधिकाधिक कठीण होऊन बसतं. यात मैत्रीतल्या एखाद्या जोडीदाराचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते.
सारांश, मैत्रीतही सुरक्षित अंतर ठेवा.