त्याचे कारण समजून घेणे महत्वाचे वाटते !
उगाचच 'पटत' नाही म्हणून नकार देणारा एखादाच असेल. अश्या वेळेस आपले नाशिब आणि आपण असे म्हणून विषय सोडून द्यावा ! ( चिंतन करावे! ).
एक उपाय करता येऊ शकेल..
आपल्या जोडीदारालापण आपल्या मित्रांमध्ये / मैत्रिणींमध्ये आणावे, जेणेकरून त्यांची ओळख होईल. आपण नक्की कोणत्या लोकांना मित्र म्हणतो ? ते कसे आहेत ?
ह्याचा उलगडा एकदा झाला कि विश्वास बसेल आणि फारसं काही अडणार नाही !
लग्नानंतर मुलीने एखाद्या मुलाशी किंवा मुलाने एखाद्या मुलीशी मैत्री ठेवण्यात काहीच हरकत नाही !