श्री. विनायकांनी सूचित केलेली अगदी वेगळीच गाणी ऐकून मजा वाटली .
 मराठी नाट्यसंगीतात अनेक पदांच्या वेगवेगळ्या गायक गायिकांच्या आवाजात बऱ्याच आवृत्या निघाल्या आहेत उदा. मा. दीनानाथ यांची  बरीच पदे आशा भोसले यांनी गायलेली आहेत. मग त्यांना वर्जन साँग म्हणायचे का?
मीराभजनाच्या  काही ध्वनिमुद्रिका लताजींच्या आवाजात अगोदर निघालेल्या असल्यामुळे  "मीरा "   चित्रपटातील तीच भजने वेगळ्या चालीवर म्हणायला लताजींनी नकार दिल्यामुळे पं. रविशंकर यानी वाणी जयराम यांचा सुर वापरला असे ऐकिवात आहे. तीही गाणी वर्जन साँग या प्रकारात मोडतील का?