माई म्हणायच्या की शब्द सुरांची शक्ती क्षीण करतो.माईंबद्दल मला नितांत आदर आहे. तरीसुद्धा वरील विधानाशी मी अजिबात सहमत नाही. उलट योग्य शब्द असले तर ते त्या सुरांची मोहिनी अधिकच वाढवतात. लताजी व आशाताई यांचेच उदाहरण घ्या. त्यांची गीते अजरामर व्हायला त्यांच्या सुरांबरोबरच, साहिर सारख्या कवींचे शब्द आणि थोर संगीतकारांच्या चाली या कारणीभूत आहेत.