बरेचदा, जोडीदार आधीच्या ग्रुप मध्ये सामवणं कठीण असतं... त्यांच्या टेस्टस जुळत नाहीत. त्याला / तिला हे चिल्लर वाटतात..... पांचट वाटतात. आधीचे कॉलेज पासूनचे मैत्रीचे जुळलेले बंध जोडीदाराशी तितक्याच घनतेने कसे काय जुळणार.....? आणि आपण आधी वेळ देऊन, सहवासाने ही मैत्री फुलवलेली असते आता ते शक्य होत नाही.... त्यामुळे लग्नानंतरची मैत्री अगदी अपवादात्मकच आढळेल..... जर दोघेही आधीपासूनच एकाच ग्रुप मध्ये असतील तर मात्र शक्य आहे.