निजणे चे आज्ञार्थी एकवचन नीज असे होते निज असे नाही. अर्थात काव्यात निज केले जाणे शक्य आहे, मात्र तसा अर्थ येथे (निज गीत मध्ये) होणार नाही.
निज चा आणखी एक अर्थ मला वाटते मूळचा/ची/चे असाही होत असावा.
उदा. जेव्हा अधिक महिना असतो, तेव्हा मूळ महिन्याच्या पूर्वी निज आणि अधिक महिन्याच्या पूर्वी अधिक शब्द लावला जातो. जसे - अधिक श्रावण आणि निज श्रावण.
चू. भू. द्या. घ्या.