मला वाटते की ,परिनिरीक्षण हा शब्द स्क्रुटिनी(छाननी), सर्वतोपरी निरीक्षण ह्या अर्थासाठी राखून ठेवला असावा.  सेन्सॉरमध्ये नुसतेच निरीक्षण नाही, तर काटछाटही अंतर्भूत असते. अभि=अभ्यासपूर्वक , अव=खाली, वाईट;  ईक्ष =पाहणे. म्हणजे अभ्यवेक्षक म्हणजे अभ्यासपूर्वक छिद्रान्वेषी वृत्तीने देखरेख करणारा. शब्द तसा योग्य आहे, पण इतक्या अचूकतेची गरज होती?  'परिनिरीक्षण'रूढ होता, वापरात ठेवायला हरकत नव्हती.