महेशराव,

निज शब्दाची ही अर्थछटा आठवून दिल्याबद्दल आभार.

ह्या छटेत निज ह्या शब्दाचा अर्थ मूळ असा नसून नैसर्गिक (कृत्रिम नसलेला) असा होतो असे वाटते.

निज महिना - नेहमीप्रमाणे आपोआप येणारा महिना

निज चा एक अर्थ स्वयंभू असाही आहे असे वाटते.

आपला
(नैसर्गिक) प्रवासी