लक्षात आल्यामुळे संकटकालीन उपाय योजून भलतीकडे उतरवावे लागले. ते विमान अखेर कोसळलेच. नंतर झालेल्या चौकशीत आढळून आले की इंधन भरणाऱ्या कर्मचाऱ्याने मीटरवरील वाचन गॅलनमध्ये आहे असे गृहीत धरून इंधन भरले. प्रत्यक्षात ते लिटर्समध्ये होते. ही कथा डिस्कव्हरीवर दाखवली होती. काम केलेल्यांच्या, चौकशी करणाऱ्या तज्ञांच्या मुलाखती देखील त्यात होत्या. एवढे इंधन भरले तरी दर्शकाचा काटा 'फूल्ल' का दाखवीत नाही असा प्रश्नही त्या विमानचालकाला पडला होता. पण दुर्दैवाने परिस्थितीचे अचूक निदान झाले नाही. विमानातल्या दर्शकात चूक असेल असेच गृहीत धरले गेले आणि अपघात घडला. इंधन स्थानकातले अभिलेख तपासून पाहिल्यावर तज्ञांना चूक कळली. अशी चूक पुन्हा होऊं नये यासाठी आता योग्य ती खबरदारी घेतली जाते. मी चित्रवाणीवर ते पाहिल्याला एकदोन वर्षे झाल्यामुळे आता विमान केव्हा कुठून कुठे चालले होते, अपघात कुठे घडला वगैरे बरेचसे तपशील बरोबर आठवत नाहीत. पण फारशी जुनी गोष्ट नसावी.

अमेरिकेत अंतरे जास्त असल्यामुळे प्रवास करतांना दीर्घ अंतराचा मानसिक दबाव येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून मैल आणि गॅलन ही परिमाणे वापरली जातात असे नेहमी वाचायला मिळते. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, हे देश पण आकाराने मोठे आहेत. तिथे कोणती मापनप्रणाली आहे ठाऊक नाही.

पासरी या शब्दाचा अर्थ प्रथमच ठाऊक झाला. 'धडा' ही माहिती नवीनच कळली. नमनाला तेल असते ते घडाभर की धडाभर असा देखील प्रश्न पडू शकतो. बंगाली मण हा शब्द चालीसेक वर्षापूर्वी किराणा दुकानदार चुलतभावाने सांगितला होता. १९६४ साली कोकणात ब्रिटीश आणि दशमान अशा दोन्ही पद्धतीत माल मागितला जायचा. पण दिला जायचा दशमान पद्धतीतच.

स्कूटरच्या, गाडीच्या रबरी चाकात हवा भरायच्या ठिकाणी दाबमापकावर अजूनही किग्रॅ. /चौसेमी तसेच पौंड/चौइंच दोन्ही पद्धतीतले आकडे आढळतात.

एक माहितीपूर्ण पण रंजक लेख वाचायला मिळाला. बंगाली मण ही शब्दयोजना वाचतांना त्याच्या दुकानातल्या गूळ, तेल, धान्य, इ. च्या संमिश्र गंधासहित अचानक आठवल्या. धन्यवाद.



सुधीर कांदळकर.