कोणाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडावे हा अन्नाप्रमाणे वैयक्तिक मुद्दा आहे असे वाटते.
जुने ते सगळेच सोने आहे असे वाटत नाही. तसेच सगळी नवीन गाणी टाकाऊ आहेत असेही वाटत नाही. पण अनेक निवडक जुनी गाणी जास्ती वेळा ऐकावीशी वाटतात.
"दरअसल ये शायरीमे तसब्बुर के कंगाली का दौर है" असे वाक्य सरफरोश मध्ये आहे. ते आजच्या काळाला जास्ती लागू होते असे वाटते.
अर्थात दुधापासून तूप बनेपर्यंत अनेक पायऱ्या असतात. तसेच जुन्या गाण्यांचे झाले असावे. तेव्हाची "पाणचट, टुकार आणि टाकाऊ" गाणी काळाच्या पडद्याआड गेली असतील असे वाटते. (सुक्या बरोबर ओले पण जळाले असेल नाही असे नाही.) तसेच आजच्या गाण्यांचे पुढे जाऊन तूप बनेल कदाचित. नव्हे बनावे अशीच अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
===
थोडे अवांतर-समांतर
बंद मुठ्ठी लाख की हे चलती का नाम जिंदगी या चित्रपटातले गाणे किशोर, रफी आणि मन्ना डे यांनी गायले होते/आहे. तेंव्हा 'हिट' झाले होते का नाही ते माहीत नाही. पण किमानपक्षी माझ्या आवडत्या 'जुन्या' गाण्यांमध्ये या गाण्याला स्थान नाही.
-भोमेकाका