जुने शहर, राजेश्वराच मंदीर, किल्ला, कोतवाली जवळ च्या पुला पलीकडे  द्रोणात मिळणारे दहीवडे, सकाळी सकाळी रेल्वे स्टेशन वर मिळणारे पोहे व गरम दूध,सगळ्या आठवणी जाग्या केल्या तुम्ही. अकोल्या ला एकाच रस्त्यावर खूप टॉकीज आहेत त्या मुळे तिकीट मिळत नाही म्हणून सिनेमा नाही अस कधी झाल नाही. कोणता न कोणता पहायला मिळेच. मी तर एकदा मानेक टॉकीज मध्ये सलग तीन दिवस चार्ली चॅप्लीन च्या  चित्रपटां च्या महोत्सवाचा आनंद घेतलाय. आता तसे रसिक टॉकीज मालक आहेत की नाहीत कुणास ठाउक.