पावसाची इथे कमी नाही
पीक येईल पण हमी नाही
जीवना उघडतोस कां पडदा?
संपल्या अजुन तालमी नाही
- छान.

'उजडला बाग' केवढा मथळा

जिंकला आम आदमी नाही
जयंतराव, मराठी गझलेत अमराठी शब्दांच्या वापरास असलेल्या तुमच्या विरोधास सौम्य करून तुम्ही इथे 'उजडला बाग' व 'आम आदमी' हे शब्दप्रयोग वापरले आहेत असे दिसते. पण मराठीत उजडणे हे क्रियापद हे उजेडाच्या संदर्भात उजेडणेचे एक पर्यायी रूप म्हणून वापरतात. उजडणे म्हणजे "टू डॉन, टू बिकम फॉर्चुनेट ऑर फेवरेबल - टाइम्स, सरकमस्टन्सेस". त्यामुळे हिंदीतील 'बाग उजड गया' च्या अर्थाने आपल्याला मराठीत 'उजडला बाग' म्हणता येणार नाही. "आम आदमी" चा एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या घोषवाक्याशी असलेला संबंध लक्षात घेता त्याचा श्लेषात्मक वापर छान आहे.