क̮शा̱स̮ हा̱ अ̮बो̱ल̮ नू̱र̮
अशा प्रकारे गणनिरीक्षण केल्यावर मला हे वृत्त 'ल गाल गाल गाल गाल' ... असे वाटले. त्याप्रमाणे
मि̮ळे̱ल̮ स्व̱र्ग̮ ए̱क̮ दी̱स̮ ...
येथे 'दीस' ऐवजी सरळ दिवस असे लिहिता आले असते असे वाटले. तसे केले असते तर 'दी' ह्या गुर्वक्षराऐवजी 'दिव' अशी दोन लघ्वक्षरे आली असती. आणि ते टाळण्यासाठी 'दीस' असे लिहिले असेल तर मग 'तरी तुला हृदय फितूर' ... येथे 'हृदय' लिहिताना ('गाल' ऐवजी 'ललल') 'हृद' अशी दोन लघ्वक्षरे घेतलेली दिसताहेत. म्हणून मी शंका विचारली.
मि̮ळे̱ल̮ स्व̱र्ग̮ ए̱क̮ दि̮व̮स̮
असे लिहिले तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वृत्तभंग कसा होईल ते समजले नाही. बहुधा मला वृत्त समजलेले नसावे, असे दिसते. कृपया अधिक माहिती द्यावी.