ल गा । ल गा । ल गा । ल गा ल ॥
वृत्ताचा लगक्रम तुम्ही बरोबर मांडला आहे, आणि त्यानुसार तुमचे म्हणणेही योग्य आहे. पण लयीत उच्चारानुसार फरक येतो. हृदय हा शब्द उच्चारताना सहसा 'हृ - दय' असा म्हटला जातो, तसाच दिवस 'दि - वस'. दीसऐवजी दि-वस वापरल्यास अखेचा 'गा ल' क्रम उलटा होऊन 'ल गा' भासतो.
मि ळे ल स्व र्ग ए क दि वस
ल गा ल गा ल गा ल ल गा
मराठीत आपण अनेकदा ह्या उच्चारांतील फरकांकडे दुलर्क्ष करतो, कधी जाणून-बुजून, कधी अनवधानाने. कदाचित आपल्यावर असलेल्या अक्षरगणवृत्तांच्या पगड्यामुळे आपण ध्वनीपेक्षा त्याच्या दृश्य प्रतीकांना अधिक महत्त्व देत असू. अन्य काही भाषांत असे नसते. उदाहरणार्थ शहर व नगर हे दोन समानार्थी शब्द घेऊ. आपण हे दोन्ही ल ल ल ठरवू व वृत्ताच्या गरजेनुसार ते गा ल किंवा ल गा असे बसवू. पण उर्दू - हिंदुस्तानीत उच्चारानुसार 'शह-र' शब्द 'गा ल' असाच घेता येईल, ल गा असा नाही. तसेच न-गर 'ल गा' होईल, 'गा ल' नाही. वृत्ताची गरज ल गा ची असल्यास शहरऐवजी नगर शब्द वापरावा लागेल.
ह्या न्यायाने मी ह्या गझलेत 'हृदय'साठी 'ल गा' क्रम स्वीकारला, पण 'दिवस'साठी तो वापरणे मला खटकले. म्हणून दीस.