धन्यवाद! फारच रंजक आणि माहितीपूर्ण लेख!
या वजन मापांसोबत आपल्या आयुष्यातील कितितरी आठवणी तसेच भाषेतले वाकप्रचार/म्हणी जोडल्या गेलेल्या असतात त्याची जाणीव झाली. तसेच जुन्याची सर्वांगिण उजळणी झाली.
'ओंजळ आणि पसा' ही हाताचे दोन्ही पंजे कसे जुळवले आहेत त्यावर अवलंबून असलेली मापेही बोली भाषेत असायची. 'द्या की पसाभर' असे बोलले जायचे. अजूनही क्वचित ऐकण्यात येतात. आणि घडा (की धडा?) हेही असेच बोली भाषेत वापरात असावे. 'नमनालाच घडाभर तेल' ही म्हण त्यामुळे असावी. पण हा घडा केवढा? हा प्रश्न आहे.