पण हे खरं की, बाजारात त्या स्पेसिफिकेशनच्या सामग्रीची उपलब्धता एकाच
ब्रँडची आहे. आता ती स्पेसिफिकेशन्स इतर कोणी पूर्ण करायची असतील तर स्वतःच
त्या सामग्रीचे उत्पादन करावे लागेल.
कधीकधी असे करण्याला पर्याय नसतो, असे वाटते. भारतातून निर्यात होणाऱ्या (मुरांबे, लोणची इ. ) पदार्थांच्या बाटल्यांवर जी झाकणे असतात, ती बहुतांशी फिरकीची झाकणे असत. परदेशात पकडीची झाकणे (लग कॅप्स) वापरली जात असल्याने त्यासंबंधातील मानक विनिर्देशांमध्ये अशा पकडीच्या झाकणांचे बंधन घालण्यात आले होते*. ही घटना जवळ जवळ २८-३० वर्षांपूर्वीची आहे. निदान त्यावेळीतरी भारतात केवळ एकच कंपनी अशी पकडीची झाकणे बनवत होती, त्यामुळे ह्या मानक विनिर्देशाबद्दल उद्योगवर्तुळात नाराजी होती. (मी घटना केवळ ऐकलेली आहे. चू. भू. द्या. घ्या. )
(सध्या अश्या पकडीच्या झाकणांचे उत्पादन भारतात इतर कंपन्याही करतात असे दिसते. नुकत्याच आणलेल्या लोणच्याच्या बाटलीवर इतर कंपनीने बनवलेले पकड-झाकण पाहायला मिळाले.)
* फिरकीची झाकणे लावताना/काढताना संपूर्ण ३६० अंशातून एकदा वा अनेकदा फिरवावी लागतात. पकडीची झाकणे फार फार तर ५-१० अंशातून फिरवली की लावता/काढता येतात. (पकडीच्या झाकणांचे आणखीही फायदे असतील. )