प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!
>'दुर्बोधता', हा एक मोठा अडसर त्या महान कवी आणि सामान्य रसिक यामध्ये राहतोच. अशी कविता समजायला प्रख्रर बुद्धिमत्ता व तरल कल्पनाशक्ती हवी.
= इतकं काही नाही फक्त थोडी संवेदनाशीलता, आवड आणि ओपननेस हवा. शब्द साधे सोपे आहेत, मांडणी, नादमयता आणि लयीचा अंदाज यांची मजा घेता आली की तुम्हाला ग्रेसची खुमारी कळेल.
दुर्बोधतेचा विचार सुरुवातीला बाजूला ठेवा आणि कविता आगदी मनापासून वाचा असं सुचवतो.
>ती आमच्यासारख्या सामान्य माणसांमध्ये नसली तर? ' जी ए' कळायला सुद्धा आम्हाला ते दोनदा वाचायला लागले.
= आपण सगळेच सामान्य आहोत. व्यक्त होण्याची प्रत्येकाची इच्छा आहे कारण तो अस्तित्वाचा स्थायीभाव आहे. कशाप्रकारे व्यक्त व्हायचं (म्हणजे माध्यम) आणि कसं व्यक्त व्हायचं (प्रक्रिया) असा आभ्यास केला की अभिव्यक्ती शक्य होते आणि तो दृष्टीकोन सर्वांना मिळावा म्हणून हा लेख लिहीलायं, तुम्ही प्रयत्न करा.
संजय