...रात्री दीडच्या सुमारास मला रस्त्यावर अडवलं पोलिसांनी महिन्यापूर्वी. मी
थांबलो. गाडी चालवण्याचा परवाना होता. तो दाखवला. प्रदूषण प्रमाणपत्र
मागितलं. ...
ही अंमलबजावणी पारंपरिक असावी. मग ती चारचाकी गाडी असो वा सायकल. तो द्रुतगती महामार्ग असो वा पुण्यातला एखादा बोळ.
हे माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे:
तेव्हा पुण्यात सगळीकडे सायकली होत्या. सायकली वापरण्यासाठी दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागे. सूर्यास्तानंतर सायकलीचा दिवा लागलेला असणे सक्तीचे होते. तेव्हा बॅटरीचे दिवेही तोपर्यंत आलेले नव्हते. बहुधा चाकाने फिरणाऱ्या डायनॅमोचे दिवेही तोवर आलेले नसावेत. सायकलला लावायचे दिवे रॉकेलचे असत!! एक शिक्षक संध्याकाळी सायकलीवरून जात असताना नेमका दिवा विझला. आणि हाडाचे शिक्षक असलेले हे गृहस्थ तो पुन्हा लावण्यासाठी उतरले. तेवढ्यात बाजूला अंधारात उभा असलेला एक पोलीस पुढे सरसावला. "दिवा लावलेला होता; पण तो विझला म्हणून तो लावण्यासाठीच मी उतरलो." ... असे स्पष्टीकरण हे गृहस्थ देऊ लागले ते तो ऐकेना. शेवटी त्यांनी त्या पोलीसाचा हात धरून त्या दिव्यावर टेकवला. त्याचा चांगला चटका बसल्यावर तो पोलीस पुढे काही बोलला नाही.