कर्णराजांच्या मानभंगाचा हा आविष्कार म्हणजे गजलचा अर्थ हरिणाचा आर्त चीत्कार आहे ह्याचा प्रत्यय देतो. द्रौपदीला सोनेरी कळी असावी असे रूप लाभले होते परंतू ती सुवर्णश्यामा अग्निकन्या होती. तिची दाहक प्रज्ञा स्वीकारण्याऐवजी वृषालीच्या शीतल स्वर्गात जीवनाची सहल करावी असा ग्रेसफुल निर्णय कर्णराजानी घेतला असावा. ही आत्ममग्न गजल पेश करून मला विचार पेश करण्याची संधी दिल्याबद्दल आभार.