मानक विनिर्देशांबाबत कधी कधी पर्याय नसतो हे खरे. माझ्या नोंदींमध्ये हे मानक विनिर्देश कोणत्या सामग्रीसाठी आहेत हे मी लिहिले आहे. संगणक वगैरेसाठी विशिष्ट मानक विनिर्देश जेव्हा येतात तेव्हा प्रश्न येतोच, आणि खरं तर, ते तसंच सारी व्यवस्था आधी करून केलं गेलं आहे.
सायकलीचा दिवा या संदर्भाने तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे. तपासणी रात्री होतेच. केलीही पाहिजे. त्यामुळंच मी गाडी थांबवून परवाना दाखवला. त्यापुढं जेव्हा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मागितलं गेलं तेव्हा माझी त्याला हरकत होती. कारण हे अधिकार त्या पोलिसांना नाहीत, असं त्याच काळात पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी जाहीर केलं होतं. त्यातूनही दंड भरण्यास मी तयार होतोच.